महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या हरपाळकर पॅटर्नमुळे विद्यार्थ्यांना आनंदाचा धक्का... आयोगाच्या निकालाला गती 

<p>महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या हरपाळकर पॅटर्नमुळे विद्यार्थ्यांना आनंदाचा धक्का... आयोगाच्या निकालाला गती </p>

नागपूर – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या निकालाच्या दिरंगाईमुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी काहीवेळा आंदोलनाचे हत्यारही उपसल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे यावेळेस आयोगाने निकालाला वेगवान गती दिली आहे. आयोगाने  ३१ मे, २०२६ रोजी घेण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित, गट-अ व गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा- २०२६’ या स्पर्धा परीक्षेच्या वस्तुनिष्ठ स्वरुपाच्या प्रश्नपुस्तिकेच्या चारही संचाच्या प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर परीक्षेच्या दुसऱ्या दिवशीच प्रसिध्द केल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.  

रविवारी राजपत्रित गट-अ व गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२६’ घेतली गेली आणि लगेच  सोमवारी एक जूनला याची उत्तर तालिका जाहीर करण्यात आली आहे. परीक्षेच्या दुसऱ्या दिवशी उत्तर तालिका जाहीर करण्याची ही इतिहासातील पहिलीच वेळ असल्याने विद्यार्थ्यांना आनंदाचा धक्का बसला आहे.