शेतकरी कर्जमाफी योजनेला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता... दोन लाखापर्यंतचे कर्ज होणार माफ

<p>शेतकरी कर्जमाफी योजनेला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता... दोन लाखापर्यंतचे कर्ज होणार माफ</p>

मुंबई - शेतकरी कर्जमाफीचा निर्णय जून महिन्यात घेतला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. त्यानुसार, आज मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजनेवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. त्यानुसार, दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज सरकार माफ करणार आहे तर नियमित पिक कर्ज भरणाऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन निधी दिला जाणार आहे. या निर्णयाचा थेट ५६ लाख शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. सध्या राज्यात विधानपरिषद निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याने या कर्जमाफीची घोषणा करण्यात आलेली नाही. आता सहकार विभागाकडून या योजनेबाबत अटी शर्तीचे परिपत्रक काढण्यात येणार आहे, त्यानंतरच या योजनेबाबत अधिक माहिती येणार आहे.