स्थायी समिती सभापती विशाल शिराळे यांनी केली नालेसफाईंच्या कामांची पाहणी...
कोल्हापूर - आज स्थायी समिती सभापती विशाल शिराळे यांनी शहरातील पावसाळापूर्व नालेसफाई कामांची प्रत्यक्ष पाहणी करुन आढावा घेतला. महानगरपालिकेमार्फत पोकलेन, जेसीबी आणि मनुष्यबळाच्या सहाय्याने प्रमुख आणि उपनाल्यांची साफसफाई सुरू आहे. सभापती शिरोळे यांनी हुतात्मा गार्डन आणि शाम सोसायटी परिसरातील कामांची पाहणी केली.
यावेळी उर्वरित नालेसफाईची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. शाम सोसायटी परिसरात ओव्हरफ्लो टाळण्यासाठी पंपिंगद्वारे पाणी उपसा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. काही ठिकाणी नाल्यात टाकलेली भर हटवण्यात आली असून खराब झालेली ड्रेनेज पाईपलाईन तातडीने दुरुस्त करण्याचे आदेश देण्यात आल्या आहेत.
पावसाळ्यात पाणी तुंबू नये, यासाठी नालेसफाईची कामे वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्यात येत असून नागरिकांनी नाल्यांमध्ये कचरा टाकू नये, असे आवाहन सभापती विशाल शिराळे यांनी केले आहे. यावेळी उपआयुक्त परितोष कंकाळ, माजी नगरसेवक, नगरसेविका आणि मुख्य आरोग्य निरीक्षक उपस्थित होते.