देशी बनावटीचे पिस्तुल जवळ बाळगून फिरणाऱ्या सराईताला अटक... लाखाचा मुद्देमाल जप्त
कोल्हापूर - स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अंमलदार वैभव पाटील यांना रेकॉर्डवरील गुन्हेगार अभिषेक घोडके हा बेकायदेशिररीत्या देशी बनावटीचे पिस्तूल जवळ बाळगून कळंब्यातील साई मंदीर ते वाशी नाका रस्त्यावर वावरत असल्याची माहिती मिळाली होती. यानुसार कारवाई करत अभिषेक मंगेश घोडके याला अटक करत त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल, एक जिवंत राऊंड, एक मोबाईल संच असा एक लाख दोन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अभिषेक घोडके याच्यावर खुनाचा प्रयत्न, मारामारी यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, अंमलदार वैभव पाटील, प्रदीप पाटील, शिवानंद मठपती, गजानन गुरव, विशाल खराडे, सत्यजित तानुगडे, संतोष बर्गे, महेंद्र कोरवी, सागर चौगले आदींनी कारवाईत सहभाग घेतला.