बसमध्ये चढताना ३ लाख रुपयांच्या दागिन्यांची पर्स लंपास

<p>बसमध्ये चढताना ३ लाख रुपयांच्या दागिन्यांची पर्स लंपास</p>

कोल्हापूर -  निगवे दुमाला येथे राहणाऱ्या वैशाली पाटील या शाहूवाडी तालुक्यातील पाटणे या आपल्या मूळ गावी जाण्यासाठी रविवारी दुपारी टाऊन हॉल बस थांब्यावर उभ्या होत्या. एस टी बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन चोरट्याने त्यांची सुमारे ३ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने असलेली पर्स लंपास केली आहे. या प्रकरणी वैशाली पाटील यांच्या फिर्यादीवरून लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.