इचलकरंजीत वाहनांमधील बॅटरी चोरीच्या घटनांमध्ये वाढ
रात्री गस्त वाढवून चोरट्यांना गजाआड करण्याची मागणी
इचलकरंजी - शहरात कापड गाठी वाहतूक करण्यासाठी ट्रक, टेम्पोचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र रस्त्याकडेला लावल्या जाणाऱ्या या वाहनांमधील बॅटरी चोरीला जात असल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत. गेल्या काही दिवसापूर्वी शिवाजीनगर पोलिसांनी तिघा जणांना गजाआड करून त्यांच्याकडून 15 बॅटऱ्या जप्त केल्या होत्या पण गेल्या काही दिवसापासून लिंबू चौक परिसरातील पार्किंग केलेल्या ट्रक, टेम्पो आणि इतर वाहनांच्या बॅटरी चोरीला जाऊ लागल्याने वाहनधारकांना आर्थिक ताण सहन करावा लागत आहे. पोलिसही तक्रारीची रीची दखल घेत नसल्याने वाहनधारक हतबल झाले आहेत. चोरीच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांनी रात्री गस्त वाढवून चोरट्यांना गजाआड करावे, अशी मागणी होत आहे.