आ. संजय गायकवाड यांच्याविरोधातली लढाई आता कोल्हापूर जिल्हा न्यायालयात सुरु 

 

<p>आ. संजय गायकवाड यांच्याविरोधातली लढाई आता कोल्हापूर जिल्हा न्यायालयात सुरु </p>

<p> </p>

कोल्हापूर - ‘शिवाजी कोण होता ’ या पुस्तकावरून सुरु झालेल्या वादावर आ. संजय गायकवाड यांच्या विरोधातील सुनावणी कोल्हापूर जिल्हा न्यायालयात होणार आहे, याबाबतचा सल्ला हायकोर्टाने दिल्याची माहिती लेखक प्रशांत आंबी यांनी दिली आहे.

प्रशांत आंबी यांनी म्हटले आहे कि, शिवाजी कोण होता? या पुस्तकाच्या शीर्षकावरून मध्यरात्री मला फोन करून शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी, महामानवांच्या नावावरून शिवीगाळ, रोज 100 पुरुष घरी ये,तील अशी माझ्या कुटुंबाला बलात्काराची धमकी देणाऱ्या आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात हायकोर्टात आम्ही जी रीटपिटीशन दाखल केली होती, ती आमच्या वकिलांनी Withdraw करावी, असा हायकोर्टाने सल्ला दिला आहे. आमदार संजय गायकवाड यांच्यावर त्यांनी केलेल्या कृत्याबद्दल दखलपात्र गुन्हा नोंदवावा, एवढीच आमची मागणी होती. हायकोर्ट आमचा आवाज ऐकेल, असं वाटलं होतं. पण त्यांनी प्रक्रियावादी निर्णय घेत जिल्हा न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला आहे. 
           गायकवाड यांनी केलेल्या फोननंतर सुद्धा मला अनेक धमक्यांचे फोन आलेले होते. प्रशांत आंबीला पाकिस्तान-चीन मधून फंडिंग येतं. त्याची संपत्ती राष्ट्रीय संपत्ती म्हणून जाहीर करा. तो नक्षलवादी आहे, राष्ट्रद्रोही आहे, विकृत प्रकाशक आहे. अशा पद्धतीची बदनामी आमदार गायकवाड आणि त्यांचे समर्थक करत आहेत. माझी चूक काय? तर मी फक्त अन्यायाविरोधात लढतोय. जिल्हा न्यायालयाने चौकशीची परवानगी देऊन सुद्धा पोलिसांनी आमदार संजय गायकवाड यांची कोणत्याही प्रकारची चौकशी केलेली नाही, असा आरोप त्यांनी केला आहे.