महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या अध्यक्षपदी रवींद्र माणगावे यांची तर उपाध्यक्षपदी संजय शेटे यांची बिनविरोध निवड 

<p>महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या अध्यक्षपदी रवींद्र माणगावे यांची तर उपाध्यक्षपदी संजय शेटे यांची बिनविरोध निवड </p>

कोल्हापूर - महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चर, मुंबईच्या अध्यक्षपदी उद्योजक रवींद्र माणगावे यांची तर उपाध्यक्ष पदी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय शेटे यांची बिनविरोध निवड झाली आहे.


गव्हर्निंग कौन्सिल सदस्यपदी आमदार राजेंद्र पाटील- यड्रावकर यांच्यासह कोल्हापूर चेंबरचे माजी अध्यक्ष आनंद माने, राजू पाटील, प्रशांत शिंदे, अजित कोठारी, धनंजय दुग्गे, संजय पाटील, धैर्यशील पाटील, गोरख माळी, नंदकुमार शहा यांची बिनविरोध निवड झाल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी सुरेश घोरपडे यांनी जाहीर केले आहे.
महाराष्ट्र चेंबरच्या माध्यमातून ‘गाव तेथे उद्योजक’ या उपक्रमासह शताब्दी वर्षानिमित्त वर्षभर अनेक योजना प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याचे अध्यक्ष रवींद्र माणगावे यांनी सांगितले. राज्य स्तरासह स्थानिक पातळीवरील व्यापारी-उद्योजकांचे प्रलंबित असणारे प्रश्न मार्गी लावण्यासाठी उपाध्यक्ष या नात्याने कटिबध्द असल्याची ग्वाही संजय शेटे यांनी दिली.