जलसंपदा विभागानं काही तासात यु टर्न घेवून, उपसा बंदीचा आदेश लागू केल्याने शेतकरी आक्रमक

<p>जलसंपदा विभागानं काही तासात यु टर्न घेवून, उपसा बंदीचा आदेश लागू केल्याने शेतकरी आक्रमक</p>

कोल्हापूर – काल जिल्ह्यातील नद्यांवरील उपसा बंदी टप्प्या टप्प्याने उठवण्यात येईल, अशी भूमिका जलसंपदा प्रशासनाने घेतली होती. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असताना काही तासात जलसंपदा विभागाने आपली भूमिका बदलून पुन्हा उपसा बंदीचा आदेश लागू केल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत.
जलसंपदा प्रशासनाने काही तासात आपला निर्णय बदलून शेतकऱ्यांची दिशाभूल केल्यामुळे आज पुन्हा एकदा  शेतकऱ्यांनी जल सिंचन कार्यालयाला घेराव घातला आहे. यावेळी शेतकऱ्यांनी आक्रमक होत कार्यालयाच्या पायऱ्यांवर ठिय्या मारला आहे. त्यामुळे कार्यालय परिसरात गोंधळ उडाला आहे.