अंबाई टैंक आणि शाहू जलतरण तलाव सुरू करण्याची मागणी

<p>अंबाई टैंक आणि शाहू जलतरण तलाव सुरू करण्याची मागणी</p>

कोल्हापूर - विद्यार्थी, खेळाडू आणि विविध क्रीडा संघटनांसाठी कोल्हापूर शहरातील जलतरण तलाव आवश्यक आहेत. मात्र कोल्हापूर महानगरपालिकेचा अंबाई टैंक आणि शाहू जलतरण तलाव बंद असल्याने अनेकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे हे जलतरण तलाव तात्काळ सुरू करण्याची मागणी लोककल्याण फाउंडेशनच्यावतीने करण्यात आली आहे. उपमहापौर अक्षय जरग यांना यावेळी  मागणीचे निवेदन देण्यात आले.

 यावेळी सुहास साळोखे, चंद्रकांत यादव, अनिल घाटगे, गणेश जाधव, अशोक गाडीवान, प्रकाश आमटे, जयंत मिठारी, जगन्नाथ सूर्यवंशी, राजेंद्र खदरे, शिवाजी जाधव, शिवाजी तावडे, चंद्रशेखर कारंडे, केरबा यादव आदी उपस्थित होते.