बिंदू चौकात पुरोगामी संघटना अन् पोलिसांमध्ये झटापट 

<p>बिंदू चौकात पुरोगामी संघटना अन् पोलिसांमध्ये झटापट </p>

कोल्हापूर – ‘शिवाजी कोण होता..?’ या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना शिंदे गटाचे आ. संजय गायकवाड यांनी फोन वरून धमकी दिली होती. या प्रकरणी आ. संजय गायकवाड यांच्यावर दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात यावा, यासाठी प्रशांत आंबी यांच्यासह पुरोगामी संघटना आक्रमक झाल्या आहेत . यासाठी आज बिंदू चौकात संघटनांच्यावतीने आ. गायकवाड आणि गृहमंत्र्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात येणार होता. परंतु सकाळपासून पोलिसांनी बिंदू चौक परिसरात मोठा बंदोबस्त ठेवला होता . 

बिंदू चौकात पोलिसांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला .यावेळी पुरोगामी संघटना आणि पोलिसांमध्ये मोठी झटापट झाली. आंदोलकांनी आम्ही आ. गायकवाड यांच्या घरावर मोर्चा काढणार असल्याचं म्हणत त्यांच्यावर दखलपात्र गुन्हा दाखल करण्याचा पवित्रा घेतला. यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.