पुढील चार दिवस पावसाचे...
राज्यात शनिवारपर्यंत वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज
कोल्हापूर - सूर्य तळपू लागल्याने राज्यात उन्हाच्या झळा वाढत आहेत. राज्यात बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा चाळीस अंशापर्यंत गेला आहे. अशातच राज्यात आता पावसासाठी पोषक हवामान तयार होवू लागले आहे. राज्यात सध्या पश्चिम वादळाची स्थिती आहे. त्यातच अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरून येणारे बाष्पमुक्त वारे वाहत आहे. यामुळे राज्यात आजपासून शनिवारपर्यंत वादळी वारा, पाऊस आणि गारपिटीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान खात्याने मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर ,कोल्हापूर ,सोलापूर, अहिल्यानगर, धुळे, जळगाव,नंदूरबार जिल्हयात तर कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्हयात विजांसह वादळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे.