सरकारी कर्मचारी, शिक्षकांच्या बेमुदत संपाला आजपासून सुरूवात...कोल्हापुरात कर्मचाऱ्यांची निदर्शने 

<p>सरकारी कर्मचारी, शिक्षकांच्या बेमुदत संपाला आजपासून सुरूवात...कोल्हापुरात कर्मचाऱ्यांची निदर्शने </p>

कोल्हापूर - जुनी पेन्शन योजना  लागू करावी आणि सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेची अधिसूचना त्वरित काढावी, या प्रमुख मागण्यांसाठी  राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्यावतीने सोमवारी मध्यरात्रीपासून राज्यव्यापी बेमुदत संप सुरू करण्यात आला आहे.  या  संपात राज्यभरातून सतरा लाख तर कोल्हापूर जिल्ह्यातुन 65 हजार शिक्षक, सरकारी आणि निमसरकारी कर्मचारी सहभागी झाले आहेत.

आज सकाळी  कोल्हापूर जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय कर्मचार्यांसह शिक्षकांनी एकत्र येत  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. जोपर्यंत  मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत महावीर उद्यानात सकाळी साडे दहा ते दुपारी दीड यावेळेत हे सर्व कर्मचारी एकत्र येणार आहेत.  मुख्यमंत्र्यांनी  एक मे पर्यंत  विविध मागण्यांवर  निर्णय  घेतला नाही तर सरकारला असहकार्याची भूमिका घेऊन जनगणना, निवडणूक आदी कामांवर बहिष्कार टाकण्यात येईल, असा इशारा संघटनेचे निमंत्रक अनिल लवेकर यांनी दिला आहे.

यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख विजय  देवणे, भाकप नेते कॉम्रेड दिलीप पवार, सिटूचे आबासाहेब चौगुले यांच्यासह विविध शिक्षक संघटनांनी या  संपाला  पाठिंबा दर्शवला. यावेळी  वसंत डावरे, संतोष अनुसे, नितीन कांबळे, राहुल शिंदे, अंकुश रानमाळे, सुदेश जाधव, प्रकाश पाटील, रमेश भोसले यांच्यासह शासकीय, निमशासकीय  शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.