उद्यापासून कोल्हापुरात मिलेट अन् फळ महोत्सवाला सुरुवात... 

<p>उद्यापासून कोल्हापुरात मिलेट अन् फळ महोत्सवाला सुरुवात... </p>

कोल्हापूर – उत्पादक ते ग्राहक थेट विक्री योजनेंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेले मिलेट्स आणि त्याचे पदार्थ तसेच विविध फळांची विक्री करण्यासाठी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव उद्यापासून २२ ते २६ एप्रिल या कालावधीमध्ये राजारामपुरीतील भारत हाऊसिंग सोसायटी हॉलमध्ये भरवण्यात येणार आहे.
या महोत्सवाचे उद्घाटन महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांच्या हस्ते  सायंकाळी चार वाजता होणार आहे. या प्रसंगी विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जस्मिन, कृषी उत्पन्न मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम, सरव्यवस्थापक विनायक कोकरे, विभागीय सहनिबंधक महेश कदम, विभागीय कृषी सहसंचालक बसवराज मास्तोळी, जिल्हा उप निबंधक नीलकंठ करे, जिल्हा कृषी जालिंदर पांगारे आदि उपस्थित राहणार आहेत. 
या महोत्सवामध्ये राज्यातील विविध प्रकारच्या मिलेटचे उत्पादन घेणारे शेतकरी, विविध प्रकारचे तृणधाण्य तसेच आंबा, डाळिंब, स्ट्रॉबेरी, अंजीर, पेरू इत्यादी विविध प्रकारचे  फळ उत्पादक शेतकरी सहभागी होणार आहेत. हा महोत्सव सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत सुरु राहणार आहे. त्याचबरोबर मानवी आरोग्याच्या दृष्टीने मिलेटचे महत्व याबाबत डॉ.सदिप पाटील, डॉ. अहिल्या वाघमोडे. डॉ.योगेस बन व डॉ. प्रतिभा थोंबरे आदि आहार तज्ञांची व्याख्याने होणार आहेत. तसेच मिलेट्सचे विविध पदार्थ आणि  त्यापासून बनविण्यात येणाऱ्या पाककृती पाहता येणार आहे. रायपूर (छत्तीसगढ) येथील मिलेट आहार तज्ञ कृष्ण मोहन यांचे मिलेटचे विविध पदार्थ तयार करण्याबाबत प्रभोदनपर रविवार कार्यक्रम असणार आहे.  तरी सर्व कोल्हापूरकरांनी महोत्सवास भेट द्यावे, असे आवाहन कृषी पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक डॉ. सुभाष घुले यांनी केले आहे.