खळबळजनक : ‘या’ गावी चोराने चक्क पोलीस अन् पत्रकारांच्या घरावर मारला डल्ला
कोल्हापूर – अनेक वेळा आपण चोरी झालेली घटना ऐकली आहे पण राधानगरी तालुक्यातील गुडाळ या गावात चक्क लोकांचे संरक्षण करणारे पोलीस आणि पत्रकारांच्या घरावर चोराने डल्ला मारला आहे. त्यामुळे गावात खळबळ उडाली आहे.
काल रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी 6 बंद घरे फोडली आहेत. यावेळी चोरट्यांनी सोने,चांदी दागिन्यांसह रोकड लंपास केल्याची माहिती समोर आली आहे.