“मी बावड्याकडेच चाललोय, तुम्ही मला दुसरीकडे का नेताय?” : नगरसेवक आदिल फरास यांच्या वक्तव्यानं सभागृहात हशा
कोल्हापूर - महापालिकेच्या सभेत सोमवारी राजकीय टोलेबाजी आणि हलक्या फुलक्या वातावरणाचा संगम पाहायला मिळाला. महापालिकेच्या मालकीच्या जागांवर स्पष्ट फलक लावावेत, अशी ठाम मागणी लाटकर यांनी केली. नगररचनेतील चुका महापालिकेच्या माथी मारल्या जात असल्याचा आरोप करत त्यांनी प्रशासनावर निशाणा साधला.
दरम्यान, मंत्री हसन मुश्रीफ यांनी २०१० ते १५ या काळात सत्तेत आल्यानंतर एकाही जागेवरील आरक्षण उठवू दिले नाही, असा दावा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे गटनेते आदिल फरास यांनी मांडला. यावर काँग्रेस नगरसेवकांनी आक्षेप घेत, त्या काळात आमदार सतेज पाटील यांचाही सत्तेत सहभाग होता, त्यांचेही नाव घ्यावे, अशी मागणी केली.
याच वेळी फरास यांनी “मी बावड्याकडेच चाललोय, तुम्ही मला दुसरीकडे का नेताय?” अशी मिश्कील टिप्पणी करताच सभागृहात एकच हशा पिकला आणि काही क्षणांसाठी तणाव निवळला.