रूई येथे पंचगंगा नदीत बुडालेल्या युवकाचा मृतदेह सापडला...

<p>रूई येथे पंचगंगा नदीत बुडालेल्या युवकाचा मृतदेह सापडला...</p>

कोल्हापूर - शिरोळ तालुक्यातील यड्राव येथील तोहिद पठाण हा सोमवारी मित्र साहिल शिरगावे  आणि सहकाऱ्यांसमवेत रूई येथील  पंचगंगा नदी पात्रात पोहायला आला होता. हे सर्व युवक बंधाऱ्याच्या पश्चिम बाजसू पोहोत होते. मात्र दुपारी बाराच्या सुमारास तोहिदला पाण्याचा अंदाज न आल्याने धरणाच्या मोहरीतून पलीकडे वाहत गेला आणि पाण्यात बुडाला. त्याच्या सहकाऱ्यांना ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तो सापडला नाही. त्यानंतर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून यांत्रिकी बोटीच्या सहाय्याने शोध मोहिम राबवली. मात्र त्या युवकाचा शोध लागला नाही. दरम्यान आज सकाळी नदीपात्रात तोहिदचा मृतदेह सापडला. हुपरी पोलिसांत या घटनेची नोंद झाली आहे.