पाटण गावात पहाटे एका घरावर दरड कोसळली...बचाव कार्य सुरु 

<p>पाटण गावात पहाटे एका घरावर दरड कोसळली...बचाव कार्य सुरु </p>

पुणे -  पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील पाटण गावात एका घरावर दरड कोसळली आहे. ही घटना पहाटेच्या सुमारास घडल्याने खळबळ उडाली आहे. सध्या बचाव कार्य सुरु असून कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेची माहिती मिळताच मावळचे तहसीलदार घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. अतिवृष्टीमुळे विसापूर किल्ल्याचा एक भाग कोसळल्याने पायथ्याला वसलेल्या पाटण गावात ही दुर्घटना घडली आहे. नंदू तिकोणेंचं घर किल्ल्यावरुन ढासळलेल्या मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहे. पहाटे 4 वाजता त्यांच्या शेजारी राहणाऱ्या अक्षय भोसलेने तिकोणेंचे घर पाहिले, मात्र पुढच्या पाच मिनिटांत स्फोटासारखा आवाज आला अन् तिकोणेंचं घर गायब झाले, असे प्रत्यक्षदर्शी अक्षय भोसले सांगत आहेत.