मागील २४ तासात जिल्ह्यात ‘इतक्या’ मिलीमीटर पावसाची नोंद 

<p>मागील २४ तासात जिल्ह्यात ‘इतक्या’ मिलीमीटर पावसाची नोंद </p>

कोल्हापूर – जिल्ह्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे सकाळी ११ वाजेपर्यंत ४८ बंधारे पाण्याखाली गेले होते. पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी ३३ फुट ४ इंच होती.
मागील २४ तासात जिल्ह्यात  ४८ पूर्णांक ६ मिलीमीटर इतका पाऊस पडला आहे. संततधार पावसामुळं जिल्ह्यातील तीन राज्यमार्ग, पाच प्रमुख जिल्हा मार्ग, आठ ग्रामीण मार्ग आणि दोन इतर जिल्हा मार्ग असे एकूण १८ रस्ते वाहतुकीसाठी बाधित झाले आहेत. धरण क्षेत्रात सुरु असलेल्या धुवाधार पावसामुळे राधानगरी आणि तुळसी धरण ४१ टक्के भरले आहे. वारणा धरण १८ टक्के तर दुधगंगा धरण १३ टक्के भरल्याची नोंद झाली आहे.