इचलकरंजीतील पंचगंगा नदीवरील जुन्या पुलाजवळ पाणी आल्याने वाहतूक बंद...
इचलकरंजी - महाराष्ट्र - कर्नाटकला जोडणारा इचलकरंजीतील पंचगंगा नदीवरील जुन्या पुलाजवळ पाणी आल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. जिल्ह्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढत आहे त्यामुळे खबरदारीची उपाय योजना म्हणून जुन्या पुलावर बॅरिकेट लावून पर्यायी मार्गाने जाण्याची सूचना प्रशासनाकडून दिली जात आहे.