मुसळधार पावसाचा फटका पावसाळी अधिवेशनाला... आजचे अधिवेशन स्थगित

<p>मुसळधार पावसाचा फटका पावसाळी अधिवेशनाला... आजचे अधिवेशन स्थगित</p>

मुंबई – आजपासून राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे. परंतु राज्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्व आमदारांना मुंबईमध्ये पोहचणे शक्य नसल्याने आजचे अधिवेशन स्थगित करण्यात आले आहे. 
राज्यात सुरु असलेल्या धुवाधार पावसामुळे अनेक महामार्ग बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे काही आमदार महामार्गावर तर काही विमानतळावर अडकले आहेत. त्यामुळे त्या आमदारांना मुंबईत पोहचणे शक्य नाही तसेच काही आमदारांनी आजचे अधिवेशन स्थगित करण्यात यावे, अशी मागणी केली होती. त्यानुसार  विधानसभेचे आजचे कामकाज स्थगित करण्यात आले आहे.