यंदा मान्सून केरळमध्ये लवकर दाखल होणार…

हवामान विभागाचा अंदाज…२६ मे रोजी केरळमध्ये मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता

<p>यंदा मान्सून केरळमध्ये लवकर दाखल होणार…</p>

पुणे - शेतीप्रधान भारतीयांचे मान्सूनच्या आगमनाकडे लक्ष लागले आहे. सर्वसाधारणपणे एक जूनला केरळमध्ये मान्सूनचे आगमन होते. परंतु आज दुपारी भारतीय हवामान विभागाने जाहीर केलेल्या अंदाजानुसार  येत्या सव्वीस मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होणार आहे. पुढच्या चोवीस तासांमध्ये दक्षिण बंगालची खाडी, अंदमानचा समुद्र तसेच अंदमान निकोबार द्विपसमुहाच्या काही भागांमध्ये दक्षिण पश्चिम मान्सून पुढे सरकण्यासाठी अनुकुल स्थिती निर्माण होणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. केरळमध्ये एक जूनला मान्सूनचे आगमन झाल्यानंतर महाराष्ट्रात सहा ते दहा जून पर्यंत मान्सूनचे आगमन होत असते. यंदा केरळमध्ये वेळेअगोदरच मान्सून दाखल होणार असल्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी मे अखेर पर्यंत तयारी करावी लागणार आहे. मान्सूनचे लवकर आगमन होण्याची शक्यता दिलासादायक असली तरी खरीप हंगामाच्या यशस्वीतेसाठी पेरणी नंतर पावसाने दडी मारु नये, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.