रात्री उशिरापर्यंत साऊंड सिस्टिमची ट्रायल घेतल्याबद्दल ‘या’ मंडळाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

<p>रात्री उशिरापर्यंत साऊंड सिस्टिमची ट्रायल घेतल्याबद्दल ‘या’ मंडळाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल</p>

कोल्हापूर - गुरुवारी कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात सर्वत्र छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. जयंतीच्या पूर्व संध्येला कोल्हापुरातील विचारे माळ येथील हिंदवी ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी रात्री उशिरापर्यंत साऊंड सिस्टिमची ट्रायल घेतली होती. या प्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी हिंदवी ग्रुपचे कार्यकर्ते अभिषेक दाभाडे, प्रेम सूर्यवंशी, स्वराज खोंद्रे, करण मोरे, श्रेयश कलढोणे, प्रणव मुळीक, आदित्य येडगे या सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.