निवडणुका संपल्या की मोदींची वसुली सुरू : काँग्रेसचा मोदी सरकारवर हल्लाबोल

<p>निवडणुका संपल्या की मोदींची वसुली सुरू : काँग्रेसचा मोदी सरकारवर हल्लाबोल</p>

नवी दिल्ली – कच्च्या तेलाचे कारण सांगू आजपासून देशभरात  पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर ३ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना महागाईचा सामना करावा लागणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. यावर काँग्रेसने ट्वीट करून मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

काँग्रेसने म्हटले आहे की, "इन्फ्लेशन मॅन मोदींनी आज पुन्हा एकदा जनतेवर महागाईचा आसूड ओढला आहे. पेट्रोल-डिझेलमध्ये प्रत्येकी ३ रुपयांची, तर सीएनजीमध्ये २ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. निवडणुका संपल्या की मोदींची लूट सुरू होते, हे आता सिद्ध झाले आहे."