डॉ. संजय डी पाटील यांचा द कॅपटन्स व्हीजन अॅवॉर्ड आणि अ पार्टनरशिप बिल्ट ऑन व्हीजन अॅवॉर्डने गौरव...

सिम्युलेशन आधारीत वैद्यकीय शिक्षण क्षेत्राातील डॉ. संजय डी. पाटील यांच्या योगदानाची दखल

<p>डॉ. संजय डी पाटील यांचा द कॅपटन्स व्हीजन अॅवॉर्ड आणि अ पार्टनरशिप बिल्ट ऑन व्हीजन अॅवॉर्डने गौरव...</p>

कोल्हापूर – एलिव्हेट हेल्थकेअरचे आंतरराष्ट्रीय संचालक रिचर्ड लिवेसी यांच्या हस्ते सिम्युलेशन आधारित वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील दूरदृष्टीपूर्ण आणि जागतिक स्तरावर प्रभाव निर्माण करणाऱ्या कार्याबद्दल डी. वाय. पाटील अभिमत विद्यापिठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांना द कॅप्टन्स व्हिजन अवॉर्डने गौरवण्यात आले.

त्याचबरोबर मागील पाच वर्षापासून एलिव्हेट हेल्थकेअर आणि डी. वाय. पाटील अभिमत विद्यापिठ यांच्यात सिम्युलेशन शिक्षण भागीदारी आहे. त्यामुळे विश्वासपूर्ण आणि वैद्यकीय प्रशिक्षणाचे भविष्य घडवण्याच्या सामाजिक  ध्येयावर आधारित या भागीदारीबद्दल 'अ पार्टनरशिप बिल्ट ऑन व्हिजन' या पुरस्काराने सुद्धा त्यांना सन्मानित करण्यात आले.

डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांनी सिम्युलेशन शिक्षण क्षेत्राात केलेले कार्याची दखल घेत त्यांनी डी. वाय. पाटील अभिमत विद्यापिठाच्या सिम्युलेशन सेंटरची जागतिक पातळीवर ओळख निर्माण केल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यासाठी सेलिब्रिटिंग अ व्हिजन या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कसबा बावड्यातील डी वाय पाटील विद्यापीठाच्या सभागृहात हा सोहळा पार पडला.

 या कार्यक्रमाला एलिव्हेट हेल्थकेअरचे आंतरराष्ट्रीय संचालक रिचर्ड लिवेसी, एलिव्हेट हेल्थकेअरचे राष्ट्रीय प्रमुख प्रवीण मित्तल, डी. वाय पाटील कृषी आणि तंत्रा विद्यापीठाचे प्र कुलपती तथा विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती.