आजपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ...
मुंबई - जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्याने देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्याच्या खिशाला कात्री लागली आहे.
दिल्लीत पेट्रोलच्या किमतीत 3.14 रुपयांची वाढ होऊन ते 97.77 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. तर डिझेल 3.11 रुपयांनी महागून 90.67 रुपये प्रति लिटर झाले आहे. यासोबतच सीएनजीच्या दरातही प्रति किलो 2 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तर मुंबईत पेट्रोलचे दर 106.54 प्रति लिटर झाले आहे. कोल्हापुरात पेट्रोल १०४.५२ वरून १०७.६६ रुपये झाले आहे तर डीझेल ९१.१४ वरून ९४.२५ रुपये झाले आहे.