‘या’ दिवशी होणार नीट परीक्षा : एनटीएनकडून तारीख जाहीर
नवी दिल्ली – ३ मे रोजी झालेली नीट परीक्षा एनटीएनने रद्द केली होती त्यानंतर आज एनटीएनने नवीन तारीख जाहीर केली आहे. रद्द झालेली परीक्षा २१ जून रोजी होणार आहे ही नीट परीक्षा पारदर्शक आणि सुरक्षित होणार असल्याचे एनटीएनचे अधिकारी धर्मेंद्र प्रधान यांनी पत्रकार परिषद घेवून जाहीर केले आहे. सीबीआयकडून या प्रकरणाचा वेगाने तपास सुरु असून २१ जून रोजी होणाऱ्या परीक्षेत कोणताही गैरप्रकार होणार नसल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली आहे. त्यामुळे देशातील विद्यार्थांना पुनर्परीक्षासाठी पुन्हा सज्ज रहावे लागणार आहे.