कोल्हापूर - राधानगरी मार्गावर आढळला बेवारस मृतदेह...

<p>कोल्हापूर - राधानगरी मार्गावर आढळला बेवारस मृतदेह...</p>

कोल्हापूर – राधानगरी मार्गावरील पुईखडी ते पिरवाडी घाटात आज सकाळी एका तरुणाचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळला आला आहे. करवीर पोलिसांकडून संबंधित तरुणाची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. 
तरुणाची बॅग आणि इतर साहित्य मृतदेहाच्या बाजूला आढळले आहे. या घटनेची  माहिती मिळताच करवीर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. संबंधित तरुण पुण्याचा असल्याची प्राथमिक माहिती सूत्रांनी दिली आहे.