शिवसेना पक्ष-चिन्हावर सुनावणी : बेजबाबदार विधानं करण्यापासून तुमच्या नेत्यांना थांबवा : सुप्रीम कोर्टाने ठाकरे पक्षाला सुनावलं
नवी दिल्ली – आज सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सुनावणी पार पडली. यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वकिलांनी ‘प्रकरण लवकरात लवकर ऐकावं’ अशी मागणी केली. यावर सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे पक्षाला चांगलेच खडसावले आहे. ‘बेजबाबदार विधानं करण्यापासून तुमच्या नेत्यांना थांबवा, असे कोर्टाने ठाकरे पक्षाला सुनावले आहे. पुढील सुनावणी ३० जुलै रोजी होणार असल्याचे कोर्टाने म्हटले आहे.