आंबा, काजू उत्पादक आक्रमक...मंत्रालयाबाहेर  उत्पादक अन् पोलिसांमध्ये बाचाबाची 

<p>आंबा, काजू उत्पादक आक्रमक...मंत्रालयाबाहेर  उत्पादक अन् पोलिसांमध्ये बाचाबाची </p>

मुंबई - यंदा कोकणातील आंबा, काजू बागायतदार शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. मात्र, सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. आंबा बागायतदारांना हेक्टरी पाच लाख आणि काजू बागायतदारांना हेक्टरी तीन लाख रुपये इतकी नुकसान भरपाई देण्यात यावी, या मागणीसाठी  आज शेतकरी नेते राजू शेट्टी, विनायक राऊत, काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाल, महादेव जानकर यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी  मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी आंदोलकांना रोखले.
दरम्यान  मंत्रालयाबाहेर आंदोलक आणि पोलिसांमध्ये मोठी बाचाबाची झाली यावेळी पोलिसांनी धरपकड केली. यावेळी आंदोलक चांगलेच आक्रमक झाले होते.  यावेळी आंदोलकांनी आंबे फेकून राज्य सरकारचा निषेध नोंदवला आहे.