पुन्हा एकदा ममता बॅनर्जी वकिलाच्या पोशाखात पोहचल्या न्यायालयात...चर्चांना उधाण
कोलकत्ता – पश्चिम बंगाल विधानसभेत पराभव झाल्यानंतर पहिल्यांदा माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या वकिली पोशाखात कोलकत्ता उच्च न्यायालयात दाखल झाल्या. त्यामुळे चर्चांना उधाण आले होते. राज्यातील निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचारासंदर्भात दाखल केलेल्या जनहित याचिकेच्या सुनावणीसाठी त्या कोलकत्ता न्यायालयात आल्या.
टीएमसीचे नेते कल्याण बॅनर्जी यांचे पुत्र शिरशमान्य बॅनर्जी यांनी या हिंसाचारासंदर्भात कोलकत्ता उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकेत शिरशमान्य यांनी अनेक भागांमध्ये पक्षाच्या कार्यालयांवर आणि कार्यकर्त्यांवर हल्ले झाल्याचा आणि त्यांना विस्थापित केल्याचा आरोप केला आहे. या विषयावर आपली बाजू मांडण्यासाठी ममता बॅनर्जी न्यायालयात हजर झाल्या.