फिफा विश्वचषकात अर्जेंटिनाची दमदार कामगिरी ; सलग दुसऱ्यांदा विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश
नवी दिल्ली – फिफा विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत स्वित्झर्लंड विरुद्ध अर्जेंटिनाने उल्लेखनीय कामगिरी करत सलग दुसऱ्यांदा विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे त्यामुळे आगामी उपांत्य फेरीत इंग्लड विरुद्ध अर्जेंटिना आणि फ्रान्स विरुद्ध स्पेन अशी लढत पहायला मिळणार आहे.
स्वित्झर्लंडचा ३-१ असा पराभव करून अर्जेंटिनाने उपांत्य फेरीत दमदार प्रवेश केला. लिओनेल मेस्सीच्या कॉर्नर किकवर अप्रतिम 'हेडर' मारून ॲलेक्सिस मॅक ॲलिस्टरने १० व्या मिनिटाला अर्जेंटिनासाठी पहिला गोल केला. केवळ १० खेळाडूंसह खेळत असूनही स्वित्झर्लंडने झुंझार खेळ करत ७२ व्या मिनिटाला डॅन एनडोयेच्या पासवर गोल करत सामना १-१ असा बरोबरीत आणला.
पुढे अतिरिक्त वेळेच्या ११२ व्या मिनिटाला ज्युलियन अल्वारेझने १८ यार्डांवरून शानदार गोल करत अर्जेंटिनाला पुन्हा आघाडी मिळवून दिली. सामन्याच्या अंतिम क्षणांत लौतारो मार्टिनेझने तिसरा गोल केला आणि ३-१ असा विजय मिळवला.