इचलकरंजी येथे मोटारीच्या विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू
इचलकरंजी – शहरातील जयहिंद नगर येथे राहणाऱ्या आशा देसाई यांना मोटारीच्या विजेचा मोठा झटका लागला. या झटक्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
आज सकाळी जयहिंद नगर येथे पाणी आले होते. पाणी आल्यानंतर आशा देसाई या मोटर चालू करत असताना त्यांना विजेचा धक्का बसला आणि त्या खाली कोसळल्या. नातेवाईकांनी त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली आहे.