आंदोलनात गुंड पाठवून आम्हाला त्रास द्यायचा कट आखला जातोय : अभिजित दीपकेचा आरोप 

<p>आंदोलनात गुंड पाठवून आम्हाला त्रास द्यायचा कट आखला जातोय : अभिजित दीपकेचा आरोप </p>

नवी दिल्ली – केंद्रीय  शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी गेल्या १४ दिवसांपासून कॉक्रोच जनता पार्टीच्यावतीने आंदोलन करण्यात येत आहे. हे आंदोलन दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरु असून या आंदोलनात सोनम वांगचुक सहभागी झाले आहेत. 
या आंदोलनावर बोलताना कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजित दीपके यांनी एक पोस्ट करून, शांततापूर्ण मार्गाने चाललेल्या आंदोलनात गुंड पाठवून आम्हाला त्रास द्यायचा आणि आंदोलन उधळून लावण्याचा कट आखला जात आहे, असा आरोप केला आहे. आम्ही संसदेवर जो मोर्चा काढणार आहोत त्याआधी आमचं शांततापूर्ण आंदोलन उधळण्यासाठी हे केलं जाणार आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.