राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे वय झाले असून...: मंत्री चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे वय झाले असून, ते आता थकले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने कोणत्यातरी पक्षासोबत जावे, असा त्यांच्याच पक्षातील नेत्यांचा दबाव वाढत असल्याचे वक्तव्य उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. शरद पवार यांनी पक्षाबाबत लवकर निर्णय घ्यावा, असेही त्यांनी म्हटले आहे.