अयोध्येतील राम मंदिराबाबत पोलिसांचा धक्कादायक खुलासा ; ४० दिवसांत तब्बल ७० वेळा चोरी  

<p>अयोध्येतील राम मंदिराबाबत पोलिसांचा धक्कादायक खुलासा ; ४० दिवसांत तब्बल ७० वेळा चोरी  </p>

अयोध्या – अयोध्येतील राम मंदिराच्या दानपेटीतील चोरीचा विषय अधिकच गंभीर झाला आहे. या चोरीमुळे भक्तांनी दान केलेल्या संपत्तीचा आणि भक्तांच्या भावनाचा मंदिर समितीने खेळखंडोबा केल्याची चर्चा सुरु झाली आहे. यावर आता पोलीस चौकशीतून धक्कादायक खुलासे बाहेर आले आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, अवघ्या ४० दिवसांत देणग्यांतील रक्कम तब्बल ७० वेळा कथितपणे चोरली गेली. तर काही दिवशी एकाच दिवशी तीन-तीन वेळा चोरी झाली आहे. चोरीच्या सर्व घटना केवळ संध्याकाळच्या शिफ्टदरम्यान घडल्या आहेत. त्यामुळे मंदिर प्रशासनाने दान रक्कमेच्या मोजणीची संपूर्ण व्यवस्था बदलण्याचा निर्णय घेतला आहे.
आरोपी अविनाश शुक्ला, अनुकल्प मिश्रा, लवकुश मिश्रा आणि करुणेश पांडे यांच्या चौकशीत अनेक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.  अविनाश शुक्ला याने एकट्यानेच ५० हून अधिक वेळा दानपेटीतील रक्कम चोरली आहे. अविनाश शुक्ला आणि अनुकल्प मिश्रा हे प्रत्येक वेळी एकमेकांना मदत करत होते. दोघांची भूमिका तसेच इतर संशयित आरोपींसोबतचे त्यांचे संबंध आणि समन्वय यांचा तपास सुरू आहे.