महापालिका आरोग्य कर्मचाऱ्याचा प्रामाणिकपणा
कोल्हापूर - प्रभाग क्रमांक १२ मधील कर्मचारी पिंटू हेगडे यांनी आपल्या कर्तव्याबरोबरच प्रामाणिकपणाचे उत्तम उदाहरण दाखवले आहे. त्यांच्या कचरा टिप्पर गाडी क्रमांक MH09FL 3920 मध्ये सनगर गल्ली, मंगळवार पेठ येथील एका वयोवृध्द नागरिकाची सोन्याची अंगठी सापडली. ही अंगठी त्यांनी प्रामाणिकपणे त्या नागरिकाला परत सुपूर्द केली. त्यांच्या या प्रामाणिक व आदर्श कार्याने कर्मचाऱ्यांबाबत समाजात विश्वास आणि मानवतेची भावना अधिक दृढ होते. त्यांचं सर्वत्र अभिनंदन होतंय.