शाहूपुरी पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड; ११ जणांवर गुन्हा दाखल


 

<p>शाहूपुरी पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड; ११ जणांवर गुन्हा दाखल</p>

कोल्हापूर - शाहूपुरी पोलीस ठाणे यांच्या पथकाने शिख गल्ली, विचारे माळ परिसरात छापा टाकून बेकायदा जुगार खेळणाऱ्या ११ जणांविरुद्ध कारवाई केली. ही कारवाई १६ मे २०२६ रोजी मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमर उर्फ बंडा अय्याज फकीर यांच्या भाड्याच्या घरामध्ये आरोपी हे बिगरपरवाना तीन पानी पत्त्यांवर पैसे लावून जुगार खेळत होते. यावेळी पोलिसांनी घटनास्थळी धाड टाकून आरोपींना ताब्यात घेतले. तसेच आरोपी उमर उर्फ बंडा अय्याज फकीर यांनी जुगार खेळण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल महेश सदानंद पाटील यांनी फिर्याद दिली असून, महाराष्ट्र जुगार कायदा कलम ४ व ५ अन्वये शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत पोलिसांनी आरोपींकडून ६१ हजार २०० रुपये रोख रक्कम तसेच विविध कंपनींचे सुमारे ८४ हजार रुपये किमतीचे मोबाईल हँडसेट असा एकूण १ लाख ४५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अधिक तपास शाहूपुरी पोलीस करत आहेत.

कारवाई पोलीस निरीक्षक संतोष डोके,पोलीस उपनिरीक्षक आकाश जाधव, सागर गुणवरे, महेश पाटील, सुशील गायकवाड, रवी आंबेकर, कृष्णा पाटील, अमोल पाटील, गौरव शिंदे ,प्रशांत आवळे, सुशील सावंत, सुरज आबिटकर, अरुण कारंडे, युवराज सूर्यवंशी सहभागी झाले होते.