जामसंडे–विजयदुर्ग महामार्गावर आंबा बागायतदारांचा संताप; टायर जाळून रास्ता रोको

<p>जामसंडे–विजयदुर्ग महामार्गावर आंबा बागायतदारांचा संताप; टायर जाळून रास्ता रोको</p>

महाराष्ट्रामधील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जामसंडे–विजयदुर्ग महामार्गावर संतप्त आंबा बागायतदार शेतकऱ्यांनी रात्री टायर जाळून वाहतूक बंद करत सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.

कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काल मुंबई येथे आंदोलन करण्यात आले होते. आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर शेतकऱ्यांमध्ये नाराजीची भावना अधिक तीव्र झाली आहे. आंदोलन चिरडण्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी केली. तसेच कोकणातील विविध भागांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यांचे दहन करून निषेध व्यक्त करण्यात आला.

जामसंडे–विजयदुर्ग महामार्गावर झालेल्या रास्ता रोकोमुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.