क्षत्रिय मराठा रियासत फौंडेशननतर्फे कापडी पिशव्यांचे मोफत वाटप...
कोल्हापूर – शहरातील क्षत्रिय मराठा रियासत फौंडेशनच्यावतीने वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात. यंदा महाराष्ट्र दीन, सरसेनापती हंबीरराव मोहिते जयंती आणि फाउंडेशनच्या तेराव्या वर्धापन दिनानिमित्त प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळा, कापडी पिशव्या वापरा, असा संदेश देत कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले.
कोल्हापूरातील भाजी मंडई, बस स्टॅन्ड, एसटी स्टॅन्ड अशा ठिकाणी सुमारे १० हजार कापडी पिशव्यांचे मोफत वाटप करण्यात आले. यावेळी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रसाद मोहिते, उपाध्यक्ष सौरभ पवार, सेक्रेटरी विपुल घाटगे, सदाशिव पाटील, अनिकेत पवार, योगेश पाटील, पुष्कर श्रीखंडे, बाबू घाटगे यांनी या उपक्रमात सहभाग घेतला होता.