नसरापूर प्रकरण : जोपर्यंत नराधमाला फाशी होत नाही तोपर्यंत कोणत्याही राजकीय नेत्यांनी कुटुंबीयांची भेट घेवू नये : वडिलांची संतप्त भावना 

<p>नसरापूर प्रकरण : जोपर्यंत नराधमाला फाशी होत नाही तोपर्यंत कोणत्याही राजकीय नेत्यांनी कुटुंबीयांची भेट घेवू नये : वडिलांची संतप्त भावना </p>

पुणे – चार वर्षाच्या चिमुकलीवर नराधमाने केलेल्या अत्याचाराने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या नराधमाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशी संतप्त भावना जोर धरू लागली आहे. यावेळी पिडीत कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी आ. रोहित पवार, सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई असे अनेक नेतेमंडळी भेट देत आहेत. परंतु याला पिडीत चिमुकलीच्या वडिलांनी नकार दर्शवला आहे. त्यांनी म्हटले आहे कि,  जोपर्यंत नराधमाला फाशीची शिक्षा होत नाही, तोपर्यंत कोणत्याही राजकीय नेत्यांनी कुटुंबीयांची भेट घेवू नये, अशी संतप्त भूमिका पीडित मुलीच्या वडिलांनी घेतली आहे.