‘राजा शिवाजी’ चित्रपटाने दोन दिवसात केली ‘इतकी’ कमाई
मुंबई - महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर अभिनेता रितेश देशमुख दिग्दर्शित ऐतिहासिक ‘राजा शिवाजी’ चित्रपट सर्व प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाने दोन दिवसात चांगली कमाई केली आहे.
शुक्रवारी पहिल्या दिवशी 12.40 कोटी तर काल शनिवारी
11.50 कोटी कमाई केली आहे. अशा प्रकारे आतापर्यंत या चित्रपटाने 23.90 कोटीचा धुवाधार गल्ला जमवला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित चित्रपट असल्याने प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या चित्रपटाला मिळत आहे.