कोडोलीत 'एक गाव, एक शिवजयंती' उत्साहात साजरी
कोल्हापूर - पन्हाळा तालुक्यातील कोडोलीत 'एक गाव, एक शिवजयंती' मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
रविवारी पहाटे पन्हाळा गडावरून शिवज्योत आणण्यात आली. यावेळी ग्रामपंचायती समोरील छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिषेक घालण्यात आला.
पारंपरिक वाद्य, लेसर शो, डॉल्बीचा दणदणाटासह जय भवानी जय शिवाजीच्या जयघोष करीत उत्साही वातावरणात भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी फटाक्यांची आतषबाजी मिरवणुकीचे खास आकर्षण ठरले होते. जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. या मिरवणूकीत कोडोलीतील विविध संस्थांचे पदाधिकारी, शिवभक्त सहभागी झाले होते.