नरेंद्र मोदींचा खोटा चेहरा आता उघडकीस आलाय : खा. प्रणिती शिंदेंचा हल्लाबोल
मुंबई – भाजप सरकारसाठी निवडणूक महत्त्वाची आहे, देशाची अखंडता महत्त्वाची नाही. मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाच्या माध्यमातून त्यांनी उत्तर भारत आणि दक्षिण भारत असा वाद निर्माण केला असून नरेंद्र मोदींचा खोटा चेहरा आता उघडकीस आला असल्याचा हल्लाबोल खा. प्रणिती शिंदे यांनी भाजपवर केला आहे.
महिला आरक्षणाच्या नावाखाली या सरकारला मतदारसंघ पुनर्रचनेचे विधेयक पारित करायचं होतं, परंतु काँग्रेसने भाजपचा खरा चेहरा उघडकीस आणला आहे. दक्षिणेच्या ज्या राज्यांनी लोकसंख्या नियंत्रित केली त्यांच्यासाठी ही शिक्षा आहे का? असा सवाल करत त्यांनी, केंद्र सरकारला महिला आरक्षण द्यायचं नाही. त्यांना फक्त त्या आडून मतदारसंघ वाढवून त्यांच्या गुंडांना सुरक्षित करायचे आहे, असा आरोप खा. प्रणिती शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.