ऑनलाईन गेमिंगच्या नादात युवकानं संपवलं आपलं जीवन...कोरोचीतील घटना
इचलकरंजी – शहराजवळील कोरोची येथील आदित्य कोळी या युवकाने ऑनलाईन गेमिंगच्या नादात आपले जीवन संपवले आहे. त्यामुळे गावातून हळहळ व्यक्त होत आहे.
आदित्य कोळी हा मोबाईलवरील ऑनलाईन गेमिंगच्या आहारी गेला होता. सुरूवातीला छोटया रकमा लावून त्याने खेळ सुरू केला. हळूहळू तो मोठया रकमा लावू लागला. पहिल्यादा त्याने दहा हजार रूपये या खेळात गमावले. त्यानंतर त्याने मित्रांकडून उसने पैसे घेवून खेळ सुरू ठेवला. त्याने तब्बल 80 हजार रूपये उसने घेतले मात्र खेळात अपयश आल्याने तो कर्जाच्या विळख्यात अडकला. या आर्थिक तणावातून त्याने रविवारी सायंकाळी आपल्या राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली आहे.
ऑनलाईन गेमिंगमुळे आपण हे पाऊल उचलत असल्याचे त्याने चिठ्ठी म्हटले आहे. आदित्य हा कुटुंबातील कर्ता मुलगा होता वर्षभरापूर्वीच त्याच्या वडिलांचे निधन झाले होते.