उचगाव - गडमुडशिंगी पाणंद रस्त्याचे डांबरीकरण लवकरात लवकर  करा अन्यथा... : ठाकरे गटाचा इशारा

<p>उचगाव - गडमुडशिंगी पाणंद रस्त्याचे डांबरीकरण लवकरात लवकर  करा अन्यथा... : ठाकरे गटाचा इशारा</p>

कोल्हापूर -  गेल्या काही दिवसांपासून उचगाव - गडमुडशिंगी पाणंद रस्त्याची खूप दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पर्याय म्हणून अनेक वाहनधारक या रस्त्याचा वापर करतात. त्यामुळे या रस्त्याचे डांबरीकरण लवकरात लवकर  करण्यात यावे अन्यथा  आंदोलन करू, असा  इशारा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे  करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांनी दिला आहे. यावेळी मागणीचे निवेदन पक्षाच्यावतीने जिल्हा परिषदेचे लेखाधिकारी प्रदीप सकटे यांना  देण्यात आले.

निवेदन देते वेळी अजित चव्हाण, बाबुराव पाटील, रामराव पाटील, कैलास जाधव, योगेश लोहार, कृष्णात तुर्के, दीपक अंकल, अजित शेटे, शरद चव्हाण,दत्त फराकटे आदी उपस्थित होते.