मोहरमच्या पार्श्वभूमिवर कोल्हापूर पोलिसांकडून संचलन...
कोल्हापूर – सध्या मोहरम सणाला प्रारंभ झाला आहे. या उत्सवादरम्यान कोणतीही अघटीत घटना घडू नये, कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी, या उद्देशाने पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी संवेदनशील भागात संचलन करण्याचे आदेश जुना राजवाडा आणि लक्ष्मीपुरी पोलिसांना दिले होते. त्यानुसार बुधवारी सायंकाळी पोलीस निरीक्षक किरण लोंढे, श्रीराम कन्हेरकर, सहाय्यक पोलिस निरिक्षक अशोक चव्हाण, उपनिरीक्षक महेश पाटील, अभिजीत भोर, सायली पडवळ, खंडू गायकवाड यांच्यासह जुना राजवाडा आणि लक्ष्मीपुरी पोलिसांच्या समावेशातून बिंदू चौक येथून संचालनाला सुरुवात झाली.
सब जेल, करवीरनगर वाचन मंदिर, जोतिबा रोड, बाबूजमाल, महाद्वार रोड, पापाची तिकटी, पान लाईन, महानगरपालिका अकबर मोहल्ला, देशभुषण हायस्कूल मार्गे दसरा चौकात संचलनाची सांगता झाली. पोलीस दलातील ८ अधिकारी, २७ पोलीस कर्मचारी आणि ५७ होमगार्डचा या संचलनात समावेश होता. उत्सव काळात कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे आवाहन संचालनादरम्यान पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी केले.