‘तुमच्यात थोडी जरी लाज असेल तर…’: आ.आदित्य ठाकरे यांचे बंडखोरांना आव्हान
मुंबई – बंडखोर खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना केलेली शिवीगाळ आणि अरेरावीच्या भाषेमुळे राजकीय नेत्यांकडून जोरदार टीका केली जात आहे. यावर आ. आदित्य ठाकरे यांनी, “तुमच्यात थोडी जरी हिंमत आणि लाज असेल तर आज खासदारकीचा राजीनामा द्या” असे आव्हान त्यांनी खासदार संजय दिना पाटील यांना दिले आहे.
आ. आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे कि, "हे आता मिंधे प्रतिनिधी झाले आहेत, लोकप्रतिनिधी राहिलेले नाहीत. शिवीगाळ करत आहेत, धमक्या देत आहेत, दादागिरीचा आव आणत आहेत. भाजप किंवा मिंध्यांच्या चेहऱ्यावर निवडणूक लढवून दाखवा. पत्रकारांना शिवीगाळ करतात, लोकांना धमक्या देतात, कार्यकर्त्यांना धमक्या देतात, हे सगळं एका बाजूला राहिलं. पण, तुमच्यात एवढाच दम असेल तर राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरे जा.