नसरापूर प्रकरणातील आरोपीला न्यायालयाने ठरवलं दोषी 

<p>नसरापूर प्रकरणातील आरोपीला न्यायालयाने ठरवलं दोषी </p>

पुणे – नसलापुरातील चिमुरडीवर अत्याचार करून हत्या केलेल्या प्रकरणाचा निकाल आज पुणे न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाने आरोपी भीमराव कांबळे याला दोषी ठरवत अंतिम निकाल २९ जूनला देणार असल्याचे म्हटले आहे.
आरोपी भिमराव कांबळेला कोणताही पश्चाताप नाही. तो दयेच्या लायकीचा नाही. ज्या मुलीने त्याच्यावर विश्वास ठेवला त्या मुलीवर त्याने ३९ मिनिटे अतिशय घृणास्पद प्रकार केला.  वैद्यकिय तपासणीत भिमराव कांबळेने या मुलीवर विविध प्रकारे लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले असल्याचे सरकारी वकिलांनी यावेळी युक्तिवाद करताना सांगितले. यावर न्यायालयाने संताप व्यक्त करत, निर्दयपणे चिमुकलीला ठार मारण्यात आले आहे, वासनेसाठी चिमुरडीवर अत्याचार केल्याचे म्हटले आहे.  पुणे जिल्हा सत्र न्यायालयात विशेष न्यायाधीश एस आर साळूंखे यांनी हा निकाल दिला आहे.