व्हेनेझुएलाला मोठा धक्का : रस्ते मधोमध दुभंगले तर घरे पत्त्यासारखी कोसळली
३९ सेकंदांच्या अंतराने दोन शक्तिशाली भूकंप
नवी दिल्ली – दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएलामध्ये मोठा भूकंप झाला आहे. ३९ सेकंदांच्या अंतराने दोन शक्तिशाली भूकंप झाले आहेत. यामध्ये मृतांचा आकडा १०,००० ते १,००,००० च्या दरम्यान जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
रिक्टर स्केलवर ७.२ आणि ७.५ तीव्रतेच्या या जुळ्या भूकंपांमुळे राजधानी कराकससह अनेक शहरे हादरली आहेत. या भूकंपामध्ये रस्ते मधोमध दुभंगले असून अनेक इमारतींना मोठे तडे गेले आहेत, तर काही घरे पत्त्यासारखी कोसळली आहेत. सध्या बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.